“आम्ही जंतर-मंतर परत मिळवू”, CJP च्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा
जंतर मंतर येथे परवानगीशिवाय प्रवेश करत तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. अभिजीत दिपके यांनीही सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे.