“सम्राट अकबराचं लग्न जोधाबाईशी नाही, आमेर पॅलेसमधल्या..”; हरीभाऊ बागडेंच्या विधानामुळे वाद
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सम्राट अकबराच्या विवाहाबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. बागडे यांनी अकबराचा विवाह जोधाबाईशी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी 'अकबरनामा'चा दाखला देत, अकबराची पत्नी दासीपुत्री असल्याचे सांगितले. तसेच, ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला. महाराणा प्रताप यांनी अकबराला पत्र लिहिल्याचा दावा देखील त्यांनी खोटा ठरवला आहे.