एकतर्फी प्रेमातून विकृत कृत्य! डॉक्टरकडून महिलेचे गुप्त चित्रीकरण; ३,००० व्हिडिओ जप्त
राजकोटमध्ये एका डॉक्टरने क्लिनिकमध्ये छुपा कॅमेरा लावून सहकारी महिला डॉक्टरचे खाजगी क्षण चित्रीत करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. आरोपी डॉ. कमल नंदाने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले. पोलिसांनी ३,००० हून अधिक व्हिडिओ जप्त केले असून, आरोपीने २५ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सुरू आहे.