“भारतानं पाकिस्तानला प्रोबेशनवर ठेवलं, जर…”, राजनाथ सिहांचा इशारा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. आज त्यांनी भुज येथील हवाई दलाच्या तळाला भेट दिली. पाकिस्तानला इशारा देताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे सांगितले. तसेच आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये, अशी मागणी केली.