पुण्याच्या रोहित राणेला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी
फ्रान्सच्या न्यायालयाने पुण्याच्या रोहित राणेला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. रोहितवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालवून अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला. 'डिसकॉर्ड' ॲपद्वारे मुलींना जाळ्यात ओढून त्यांना गुलाम बनवले जात असे. अमेरिकन तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याच्या क्रूरतेवर कडक शिक्षा दिली.