RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली भूमिका!
भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या संसदेत केलेल्या विधानानंतर 'पांचजन्य' साप्ताहिकाने जातीव्यवस्थेचं समर्थन केलं आहे. संपादक हितेश शंकर यांनी जातीव्यवस्थेचं महत्त्व आणि घुसखोरांनी केलेले हल्ले यावर भाष्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. मोहन भागवत यांनी जातीभेद नष्ट करण्याची भूमिका मांडली आहे. या लेखामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.