“जातीय भेदभाव कायदे किंवा प्रवचनांनी संपणार नाही, तर..”, RSS च्या नेत्याचे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसबळे यांनी भोपाळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जातीआधारित भेदभाव आणि अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील कलंक असल्याचे सांगितले. त्यांनी भेदभाव संपवण्यासाठी वैयक्तिक वर्तनात बदल आवश्यक असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान उंचावली असून, संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य आणि पर्यावरण रक्षणात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. भारताच्या प्रगतीमुळे मानवतेला लाभ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.