‘रशियाच्या हल्ल्यात एक भारतीय ठार’, पंतप्रधान मोदी-पुतिन भेटीनंतर झेलेन्स्कींचा मोठा दावा
रशिया-युक्रेन युद्धात क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झेलेन्स्की यांनी हे आरोप केले आहेत.