“इराणच्या अणु प्रकल्पावर हल्ला करू नका, अन्यथा कुणीही…”, रशियाचे अमेरिका-इस्रायलला आवाहन
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करू नये, असा इशारा रशियाच्या रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिकाचेव्ह यांनी दिला आहे. अशा हल्ल्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि किरणोत्सर्गाच्या परिणामातून कोणताही देश सुटणार नाही. बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाने आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विखंडनक्षम पदार्थ असल्याने हल्ल्यामुळे महाभयंकर आपत्ती ओढवू शकते.