कंगना रणौत म्हणाली; “रामदेवबाबा माझे मोठे भाऊ”, वादावर टाकला पडदा
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. रामदेवबाबांनी कंगनाला राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट पाठवली, ज्यावर कंगनाने त्यांना मोठा भाऊ संबोधत भेटवस्तू स्वीकारली. कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत "सब भूल चूक माफ" म्हणत वादावर पूर्णविराम दिला. दोघांनीही रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाद मिटवला आहे.