१५ वर्षे निवडणूक नाही, तरी सभागृह सुरूच; शिखांची ‘मिनी संसद’ न्यायालयीन वादात का अडकली?
भारतातील लोकशाहीवर आधारित सर्वात मोठी धार्मिक संस्था असलेल्या एसजीपीसीची निवडणूक गेल्या १५ वर्षांपासून रखडली आहे. २०११ नंतर सार्वत्रिक निवडणूक न झाल्याने जुनेच सभागृह आजही कार्यरत आहे. हरियाणाची स्वतंत्र गुरुद्वारा समिती (HSGMC), दाढी-केस कापणाऱ्या शिखांच्या मतदानाचा हक्क आणि पंजाब उच्च न्यायालयातील स्थगिती; या कायदेशीर वादात शिखांची ‘मिनी संसद’ अडकली आहे.