“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल मी कृतज्ञ”, शेख हसीनांच्या मुलाने मानले मोदींचे आभार
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्याबद्दल त्यांच्या मुलाने, सजीब वाझेद जॉय यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओद्वारे त्यांनी भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बीएनपी पक्षाचे प्रवक्ते अमिर खसरू मेहमूद चौधरी यांनी शेख हसीना यांना बांगलादेशातील मोस्ट वाँटेड व्यक्ती म्हणून संबोधले आहे.