“स्मित मच्छार हे खरे हिरो”, वैमानिकासाठी पंतप्रधान मोदींची खास पोस्ट
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात दोन वैमानिकांमध्ये झालेल्या संघर्षात १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. गंभीर जखमी असतानाही त्यांनी हल्लेखोराचा प्रतिकार करून प्रवाशांचे प्राण वाचवले. मोदींनी त्यांना 'रिअल हिरो' म्हटले आहे.