“सोनम रघुवंशी फोनवर सासूशी खोटं बोलली आणि रडारवर आली”, नेमकं पोलिसांनी काय सांगितलं?
मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशीला तिच्या पती राजाची हत्या केल्याच्या आरोपात अटक केली आहे. सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. हनीमूनसाठी शिलाँगला गेलेल्या राजाची हत्या करून त्याचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. सोनमने खोटं बोलून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण तपासात तिचा खोटेपणा उघड झाला. सोनमला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.