“..तर राजाला मीच ढकलून देईन”; सोनम रघुवंशीकडे तयार होता राजाच्या हत्येचा प्लान बी?
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे. ११ मे रोजी लग्न झाल्यानंतर २० मे रोजी मधुचंद्रासाठी गेलेल्या राजाची २३ मे रोजी हत्या करण्यात आली. सोनमने तिच्या बॉयफ्रेंड राज कुशवाहाच्या मदतीने हा कट रचला होता. हत्येचा प्लान बीही तयार होता. हत्या अपयशी ठरल्यास सोनमने राजाला खाली ढकलण्याचा विचार केला होता. हत्येनंतर सोनम इंदूरला परतली आणि राजसोबत फ्लॅटमध्ये राहिली.