दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवाशी जखमी
दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (१५ फेब्रुवारी) रात्री चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवाशी जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दोन विशेष गाड्या चालवल्या जात होत्या. या गाड्यांमध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर ही घटना घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.