Student Protests In India: सविस्तर: विद्यार्थी आंदोलने – कॅम्पसपासून शाळेच्या मैदानापर्यंत
पेपरफुटी, नोकर भरतीतील अनिश्चितता, वसतिगृहांचे प्रश्न, शाळांची दुरवस्था, मानसिक ताण, विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा अधिकार यांवरून सध्या महाराष्ट्रापासून दिल्ली, राजस्थान, बिहार, तेलंगणापर्यंत विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. दिल्ली, जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमधली आंदोलने अनेकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहेत. मग आजच्या विद्यार्थी आंदोलनांकडे इतक्या बारकाईने का पाहावे लागते? महाराष्ट्रापासून दिल्ली, राजस्थान, बिहार आणि तेलंगणापर्यंत एकाच वेळी विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष का धुमसतो आहे?