दिल्लीतील मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना जामीन मंजूर
दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते. न्यायालयाने त्यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे, ज्यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.