“न्यायाधीशांना इतरांना दुखावताही यायला हवं”, न्यायमूर्ती अभय ओक यांचा संदेश!
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक २३ मे २०२५ रोजी निवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी न्यायाधीशांनी ठाम राहण्याचे महत्त्व सांगितले. निवृत्ती शब्दाचा तिटकारा असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायमूर्ती ओक यांनी १९८३ साली वकिली सुरू केली आणि २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाले. त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम पाहिले.