अमेरिकेत तरुणाने भारतीय तिरंगा फाडला; संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेच्या टेक्सासमधील फ्रिस्को येथे एक व्यक्ती भारतीय ध्वज फाडताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिटी हॉलसमोर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओत ध्वज फाडणाऱ्या व्यक्तीला काही लोक समर्थन देताना दिसत आहेत. या घटनेवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.