पाकिस्तानविरोधात भारताचं मोठं पाऊल, व्हिसाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांनी अटारी सीमेवरून मायदेशी परतण्यास सुरुवात केली आहे.