‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत एकही भारतीय नाही, बांगलादेशच्या युनूस यांना स्थान
टाइम मासिकाने २०२५ साठी जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, टेस्लाचे मालक एलॉन मस्क आणि बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचा समावेश आहे. मात्र, यंदा एकाही भारतीयाचे नाव नाही. यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे: लीडर्स, टायटन्स, आयकॉन्स. भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरमानी यांचा समावेश आहे, त्या वर्टेक्स फार्मास्युटिकलच्या सीईओ आहेत.