तिरुपती लाडू प्रसादातील भेसळ प्रकरणात ‘ईडी’कडून प्रमुख सूत्रधाराला अटक!
तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात भेसळ प्रकरण गंभीर वळणावर आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खुलासा केला की शुद्ध गाईच्या तुपाऐवजी पाम तेल, पाम कर्नल ऑइल आणि रसायनांच्या मिश्रणाने बनावट तूप वापरले जात होते. 'सुक्रिती फूड्स'चा प्रवर्तक कैलाश चंद मंगला याला अटक करण्यात आली आहे. २०१९-२०२४ दरम्यान २३० कोटी रुपयांच्या तुपाच्या पुरवठ्यात ९६ कोटींची भेसळ झाल्याचा आरोप आहे.