‘आईच्या पाया पड, माफी माग’; पालकांचं घर हडपणाऱ्या मुलाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
सुप्रीम कोर्टाने एका ताज्या प्रकरणात आई-वडिलांची मालमत्ता हडप करणाऱ्या मुलाला फटकारले. न्यायालयाने मुलाला आईच्या पाया पडून माफी मागण्याचे आदेश दिले. दिल्लीतील वृद्ध दाम्पत्याने मुलाला घराचा पहिला मजला दिला होता, परंतु मुलाने खोटी कागदपत्रे तयार करून मालकी हक्क सांगितला. कनिष्ठ आणि उच्च न्यायालयांनी आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयानेही मुलाची याचिका फेटाळून लावली.