‘मि. सिंग आमच्या देशातून निघून जा’, ट्रम्प प्रशासनाची भारतीयांविरोधात वंशद्वेषी जाहिरात
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत भारतीयांना देश सोडून जाण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर्स चित्रपटातील पात्रांचा आधार घेऊन ही पोस्ट तयार करण्यात आली आहे. हिंदू आणि शीख संघटनांनी या जाहिरातीचा विरोध केला आहे. होमलँड सिक्युरिटीने अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा भाग म्हणून ही पोस्ट केली आहे.