अमेरिकेचा यू-टर्न! ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ले रद्द; कराराला मंजुरी मिळाल्याचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हवाई हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच यू-टर्न घेतला आहे. त्यांनी इराणबरोबर शांतता करारासंबंधित सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करत, नियोजित हवाई हल्ले रद्द केल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' अकाउंटवरून ही माहिती दिली. कराराला मंजुरी मिळाल्याचा दावा करत, त्यांनी इराणवर होणारे हल्ले रद्द केले आहेत. करार पूर्ण होईपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी कायम राहील.