‘मला फरक पडत नाही!’; इराणबरोबरची चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांचा पवित्रा
पाकिस्तानच्या मध्यस्तीने अमेरिका आणि इराण यांच्यात ३८ दिवसांच्या युद्धानंतर दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला. मात्र, पाकिस्तानातील उच्चस्तरीय शांतता चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे इराणविरोधात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण चर्चेला येईल की नाही, याने फरक पडत नाही, असे स्पष्ट केले. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.