त्विशा शर्माच्या मृत्यूपूर्वी काय घडलं? सीबीआयनं ८० किलो वजनाच्या पुतळ्यासह केली तपासणी
३३ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणामुळे हुंडाबळीचा मुद्दा चर्चेत आला. मध्य प्रदेश सरकारने सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर तपास वेगाने सुरू झाला. त्विशाच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सीबीआयने घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्विशाच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली असून, हुंडाबळी आणि छळाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.