महामार्गावरील फलकावर हिंदीचा वापर; तमिळनाडूतील दोन अधिकारी निलंबित
तमिळनाडू राज्यातील महामार्गावरील दिशादर्शक फलकावर हिंदी भाषेचा वापर केल्यामुळे दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यातील द्वि-भाषा धोरणावरून राजकीय वाद उफाळला आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सरकारवर टीका करत हिंदी लादण्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने तमिळ आणि इंग्रजी भाषेचे धोरण कायम ठेवण्याचे आश्वासन दिले असतानाही हिंदी फलक लावल्याने विरोधकांनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.