मॉस्कोवर युक्रेनचा १ हजार ६०० ड्रोन्सने भीषण हल्ला, झेलेन्स्कींनी VIDEO केला शेअर
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आता युक्रेनने मॉस्कोतील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर भीषण ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं असून दोन जण ठार, सहा जखमी झाले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर करत सैन्याचं कौतुक केलं. मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी हा हल्ला निवडणुकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.