“वाईट प्रवृत्तीची माणसं आकर्षित होतील असं…”, महिला डॉक्टरांसाठी सूचना
आसाममधील सिलाचर मेडिकल कॉलेजने महिला कर्मचाऱ्यांसाठी काढलेले परिपत्रक मागे घेतले आहे. या परिपत्रकात कर्तव्यावर असताना भावनिकरित्या कठोर राहण्याचे आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे लक्ष वेधून घेणारे वर्तन न करण्याचे आवाहन होते. कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त झाला आहे.