व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर मैत्री करुन लग्न, मग धर्मांतर; मुस्लीम तरुणीला अटक, प्रकरण काय?
उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराच्या आडून मालमत्ता हडप करण्याचा आरोप चांदणी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांच्यावर करण्यात आला आहे. देवराज मलिक यांनी तक्रार दाखल केली की, त्यांच्या मुलगा आयुष मलिकला धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. आयुषने इस्लाम धर्म स्वीकारला आणि मोहम्मद अली नाव घेतले. पोलिसांनी चांदणी आणि तिच्या वडिलांना अटक केली असून, तपास सुरू आहे.