Video: “मोदी तेरी कब्र खुदेगी”, काँग्रेसच्या घोषणाबाजीवर भाजपाचा संताप; लोकसभेत खडाजंगी!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर वाद झाला. काँग्रेसच्या एका सभेत पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसकडून माफीची मागणी केली. या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ झाला आणि कामकाज तहकूब करावं लागलं. रिजिजू यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.