२५ वर्षे भजी विक्री करणारे वडील… मुलीने केली कमाल! जाणून घ्या कोण आहे IAS दीपेश कुमारी?
IAS दीपेश कुमारी यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. राजस्थानच्या भरतपूरमधील लहान घरात राहून, दीपेशने शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली. एमबीएम इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक आणि आयआयटी मुंबईतून एम.टेक पूर्ण केल्यानंतर, तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी, दुसऱ्या प्रयत्नात २०२१ मध्ये ९३ वा रँक मिळवून आयएएस अधिकारी बनली. तिच्या वडिलांनी कष्ट करून कुटुंबाला आधार दिला. दीपेश आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.