इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला; औषधे नेणाऱ्या विमानाला लक्ष्य केल्याचा दावा
मध्यपूर्वेतील तणाव वाढला असून, इराणने अमेरिकेवर त्यांच्या 'महान एअर' विमानावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे विमान औषधे आणि वैद्यकीय उपकरणे घेऊन जात होते. इराणी दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.