अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांची ज्ञानेश कुमारांच्या कार्यपद्धतीवर टीका
अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी भारतातील प्रारूप मतदार याद्यांमधून १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या कारवाईची तुलना अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांशी केली आहे. जयपाल यांनी भारतातील लोकशाहीविरोधी कृत्यांविरोधात सुरू असलेल्या अहिंसक आंदोलनांना पाठिंबा दर्शवला आहे.