भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती…
अमेरिकेत राहून भारतात घातपाताच्या धमक्या देणारा गुरुपतवंतसिंग पन्नू याला भारत सरकारने वाँटेड दहशतवादी घोषित केले आहे. २०२० मध्ये पंजाबच्या मोगा जिल्हाधिकारी कार्यालयावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याच्या प्रकरणात एनआयएने पन्नूच्या बँक खात्याची माहिती अमेरिकेकडे मागितली होती. मात्र, अमेरिकेने स्थानिक कायद्यांचे कारण देत ही मागणी फेटाळली आहे. पन्नूला भारताचा ताबा मिळालेला नाही.