अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची बाजी; मराठमोळा आमदारही दुसऱ्यांदा विजयी!
अमेरिकेच्या 2024 निवडणुकीत सहा भारतीय अमेरिकन नेते स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून निवडून आले आहेत. यात मराठमोळे श्री ठाणेदार सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. सुहास सुब्रमण्यम व्हर्जिनियातून पहिल्यांदा निवडून आले. काँग्रेसमधील 'समोसा कॉकस'मध्ये आता सहा भारतीय अमेरिकन सदस्य आहेत. डॉ. अमिश शाह यांच्या विजयाने ही संख्या सात होण्याची शक्यता आहे. राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल, आणि अमी बेरा हेही पुन्हा निवडून आले आहेत.