रशियाकडून तेल खरेदी केल्यास भारतावर १००% टॅरिफ! अमेरिकेच्या संसदेत विधेयक पुढे सरकलं
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात शुल्क लावण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतावरही हे शुल्क लागू होऊ शकते. या विधेयकामुळे इराणवरील निर्बंधांचा कालावधी वाढवला जाईल. हे विधेयक राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यापूर्वी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्समध्ये अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे.