इराकमध्ये अमेरिकेच्या KC-135 रिफ्यूलिंग विमानाचा अपघात झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इंधन भरण्याच्या वेळी हे विमान कोसळले. यात पाच क्रू सदस्य होते. शत्रूच्या हल्ल्याची शक्यता फेटाळण्यात आली आहे.
अनेकांनी आपल्या घरात एका गोष्टीच निरीक्षण केलंच असेल, ते म्हणजे घरातील आई-वडील सारखाच आहार घेत असतील, एकत्र व्यायामाला जात असतील; किंबहुना तुमची आई- वडिलांपेक्षा जास्त कष्ट करत असूनही, तिचे वजन कमी होण्यात मात्र अनंत अडचणी येत असतात. त्यामुळे वजन कमी करण्याचे जुने उपाय सर्वांसाठीच योग्य असल्याचा समज नव्या संशोधनाने मोडीत काढला आहे. त्याच नव्या संशोधांनाचा घेतलेला हा आढावा.
सध्याच्या आधुनिक राहणीमानात आपण नकळतपणे अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत. केवळ खाण्यापिण्यामुळेच नाही, तर आपण वापरत असलेले प्लास्टिक, नायलॉनचे कपडे आणि रबराच्या चपला सुद्धा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत, असे अनेक वर्षांच्या वैद्यकीय निरीक्षणातून समोर आले आहे. प्लास्टिक, नायलॉनचे कपडे आणि रबराच्या चपलांमुळे त्वचारोग, मधुमेह आणि हृदयाच्या समस्या कशा वाढतात, हे या लेखात वैद्य प. य. वैद्य खडिवाले यांनी सविस्तर मांडले आहे.
१९९१ साली देशाची प्रतिष्ठा आणि अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी देशाला सोने विदेशी बँकांमध्ये गहाण ठेवावे लागले होते. १९९१ चे ते आर्थिक संकट म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात कठीण, तरीही देशाला नव्या दिशेकडे नेणारा एक टर्निंग पॉईंट ठरला. १९९१ साली ज्या देशाकडे अवघ्या ३ आठवड्यांचे चलन होते, त्याच भारताचा परकीय चलन साठा आज २०२४-२५ मध्ये ७०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. आज भारत सोने गहाण ठेवणारा देश नाही, तर जगातील सर्वात मोठा सोने खरेदीदार देश ठरला आहे.
Akshay Kumar Eye Surgery: आजकाल डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. बराच वेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर काम करणं, चुकीची जीवनशैली आणि वाढतं प्रदूषण यामुळे कमी वयातच अनेकांना चष्मा लावावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सपासून सुटका मिळवण्यासाठी दृष्टी सुधारणा शस्त्रक्रिया म्हणजेच व्हिजन करेक्शन सर्जरी (Vision Correction Surgery) चा पर्याय निवडत आहेत.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भोजशाला-कमाल मौला मशीद परिसर मंदिर असल्याचा निर्वाळा दिला आहे. धार येथील या वादग्रस्त ठिकाणी पूर्वी देवी वागदेवी सरस्वतीचं मंदिर होतं, असा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने या दाव्याला मान्यता देत हिंदू समुदायाला पूजेची परवानगी दिली आहे. अयोध्या प्रकरणानंतर देशभरातील काही ठिकाणांची चर्चा वाढली होती, त्यात भोजशालाही समाविष्ट होती.
Shani JayantiShani Sadesati 16 May Horoscope: यंदा शनी जयंती १६ मे, शनिवारी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी शनीदेव मीन राशीतच विराजमान असतील. खरं तर, शनी जयंतीच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती असेल, ज्याचा प्रभाव काही राशींवर थोडा अधिक दिसून येईल. ज्योतिषांच्या मते, सध्या मीन, कुंभ आणि मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू आहे, तर सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर ढैय्याचा प्रभाव आहे. पुढील काळात,
कन्नड अभिनेते दिलीप राज यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिलीप राज यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेता-निर्मात्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. त्याच पार्श्वभूमीवर हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षण दिसतात आणि योग्य उपाय केले तर हार्ट अटॅक रोखता येवू शकतो का? याचा घेतलेला हा आढावा.
सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निवाड्यात स्पष्ट केले आहे की, मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून त्यांच्या अस्तित्वाशी निगडित मूलभूत अधिकार आहे. राजस्थानमधील राजस्थानी भाषेच्या संदर्भातील हा निर्णय महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि स्थानिक भाषांसाठीही तितकाच दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षणाचा अधिकार (RTE) आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा मेळ घालत न्यायालयाने भाषिक अस्मितेला घटनात्मक संरक्षण दिले आहे.
Today Horoscope 15 May 2026: आज १५ मे २०२६ रोजी ग्रहांचा राजा सूर्य यांनी गोचर केले आहे. या गोचराचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींवर दिसू लागला आहे. आज सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी सूर्याचे हे गोचर झाले. आता जवळपास एक महिना सूर्य वृषभ राशीतच राहणार आहेत. या काळात काही राशींचे नशीब जोरदार साथ देणार असून त्यांना अनेक क्षेत्रांत फायदा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आजपासून नेमक्या कोणत्या ५ राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे.
Today Horoscope 15 May: आज म्हणजेच १५ मे रोजी सूर्य ग्रह आपल्या उच्च राशी मेषमधून बाहेर पडून वृषभ राशीत गोचर करणार आहेत. सूर्याचे हे गोचर सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होईल. सूर्य वृषभ राशीत प्रवेश करताच मिथुन राशीत असलेल्या गुरु ग्रहासोबत द्विद्वादश योग तयार होणार आहे. कारण सूर्य गुरु ग्रहापासून द्वादश भावात असतील, तर गुरु सूर्यापासून दुसऱ्या भावात असतील.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर भागात राहणाऱ्या २० वर्षीय NEET परीक्षार्थीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे मोदी सरकारनं परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. यामुळे परीक्षार्थी तणावाखाली आले. लखीमपूरमधील युवकाच्या आत्महत्येचं कारणही हेच असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गोव्यातही अशाच प्रकारे एका १७ वर्षीय परीक्षार्थीनं आत्महत्या केली आहे.
एनटीएनं दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या निर्देशांनुसार रद्द केलेली NEET PG पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता, परंतु आता तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास व नियोजन करण्यास मदत होईल.
बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने एक काळ गाजवला आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या माधुरीने कथकचे प्रशिक्षण घेतले. पुढे बॉलीवूडमध्ये काम करताना माधुरीने जितके अभिनेयातून प्रेक्षकांची मने जिंकली, तितकीच ती तिच्या डान्ससाठी ओळखली गेली. अभिनय, नृत्य आणि तिने साकारलेल्या विविध भूमिका यामुळे माधुरी बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री ठरली. मात्र माधुरी दीक्षितला अभिनेत्री नाही तर पॅथोलॉजिस्ट व्हायचे होते. तिच्या नशिबात सिनेविश्वात स्वतंत्र्य ओळख निर्माण करणे लिहिले होते.
Midnight Born People Qualities: मध्यरात्रीचा वेळ सामान्य लोकही खास मानतात. ज्योतिषशास्त्रातही या वेळेबद्दल वेगळी मांडणी करण्यात आली आहे. या शास्त्रानुसार, जन्माची ही वेळ व्यक्तीच्या स्वभाव, विचार आणि जीवनऊर्जेशी खोलवर जोडलेली असते. अशा लोकांमध्ये वेगळीच अंतर्गत शक्ती, गूढ विचारसरणी आणि तीव्र संवेदनशीलता असते. चला तर मग जाणून घेऊया, ही वेळ इतकी महत्त्वाची का मानला जाते आणि या वेळेत जन्मलेल्या लोकांमध्ये कोणते खास गुण पाहायला मिळतात?
Numerology Prediction: काही लोक आपली खरी विचारसरणी कधीच समोर येऊ देत नाहीत. ते चेहऱ्याने खूप शांत आणि निरागस दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात. अंकशास्त्रानुसार, काही मूलांकाचे लोक खूपच हुशार आणि मास्टरमाइंड व्यक्तिमत्त्वाचे मानले जातात. जाणून घेऊया, कोणत्या मूलांकाचे लोक असे असतात.
Toilet Cleaning Tips: टॉयलेट साफ करणं अनेकांना खूप अवघड काम वाटतं. विशेषतः टॉयलेट खूप घाण झालं असेल, तर ते स्वच्छ करताना लोकांची दमछाक होते. टॉयलेट सीटवरचे डाग, दुर्गंधी आणि पिवळेपणा काढण्यासाठी लोक तासन्तास ब्रश घासत राहतात. अनेकदा इतकी मेहनत करूनही टॉयलेट पूर्णपणे स्वच्छ होत नाही.
इराण-इस्रायल संघर्षामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलनाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. या निमित्ताने १९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी देशासाठी सोनं दान करण्याचे आवाहन केले होते.
अमिताभ बच्चन यांचा “डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है” अशा डायलॉगमुळे डॉन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यातील 'खाइके पान बनारसवाला' गाणे हे खरंतर 1973 साली तयार करण्यात आले होते. डॉन नाही तर देव आनंद यांच्या बनारसी बाबू चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते. मात्र नंतर डॉनची शूटिंग देखील पूर्ण झाली असताना, अगदी शेवटच्या क्षणी, खाइके पान बनारसवाला गाणे चित्रपटात घेण्यात आले आणि तुफान लोकप्रिय झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विधानभवनात बुलेटवर प्रवेश केला. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर फोटो शेअर करत हे स्पष्ट केले. फडणवीसांनी पुढील ६ महिने कोणताही मोठा सरकारी कार्यक्रम न करण्याची घोषणा केली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचे महत्त्व स्पष्ट केले आणि सोशल मीडियावरील आक्षेपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली.
Budhaditya Rajyog: शनी जयंतीच्या दिवशी तयार होणारा बुधादित्य योग काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतो. हा योग अनेक लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकतो, असं मानलं जात आहे. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात आणि यश मिळण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये गेल्या १० दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर काँग्रेसप्रणीत यूडीएफने शोधलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्याशी थेट स्पर्धा असलेल्या व्ही. डी. सतीशन यांना केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं आहे. काँग्रेस नेतृत्वाने चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
25 May Horoscope: २५ मे २०२६, सोमवारच्या दिवशी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सूर्याचं नक्षत्र गोचर होणार आहे. सूर्य ग्रह रोहिणी नक्षत्रात ८ जूनपर्यंत राहतील. त्यानंतर सूर्य मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करतील.
सूर्य गोचर राशीभविष्य (25 May Horoscope)
सूर्य रोहिणी नक्षत्रात असल्यामुळे चार राशींना फायदा होणार आहे. या लोकांना आयुष्यात चांगल्या संधी मिळतील. सूर्य ग्रह रोहिणी नक्षत्रात असताना पुढील १५ दिवस वृषभ, मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना लाभ होईल.
Today Horoscope 14 May: शुक्र ग्रह १४ मे २०२६ रोजी सकाळी १०:५८ वाजता गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या स्वामित्वाच्या मिथुन राशीत शुक्राचे आगमन ५ राशींसाठी प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये यशाचे योग निर्माण करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी बीजिंगमध्ये दाखल झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत व्यापारविषयक संबंध, इराण युद्ध, तैवानचा मुद्दा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी द्वीपक्षीय संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या सोबत अमेरिकेतील प्रमुख कंपन्यांचे सीईओ आणि गृहसचिव मार्को रुबियो यांचादेखील समावेश आहे.
दोन दशकांपूर्वीचा एक विस्मरणात गेलेला व्हिडिओ सध्या तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाचे आणि कुतूहलाचे केंद्र ठरला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याने ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) या आपल्या नव्या पक्षाद्वारे राजकारणात दमदार एन्ट्री केल्यामुळे राज्याची समीकरणे बदलली आहेत. अशातच, लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अगदी मिश्कीलपणे व्यक्त केले होते.
हंताव्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो आणि आपण भीती न बाळगता कोणती खबरदारी घेतली पाहिजे? मे २०२६ मधील जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. गिरीश ब. महाजन यांनी दिलेली ही सविस्तर माहिती. उंदरांपासून होणारा प्रसार, लक्षणे आणि बचावाचे उपाय या लेखात सविस्तर दिले आहेत. स्वच्छतेची शिस्त हीच या विषाणूविरुद्धची खरी ढाल आहे.
Gold Lucky Zodiacs: ज्योतिषशास्त्रात सोन्याला सूर्य आणि गुरु ग्रहाचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की ज्यांच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह मजबूत असतात त्यांनी सोने घालणं शुभ ठरतं. सोने घातल्याने नशीब मजबूत होतं आणि आयुष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र, प्रत्येकाला सोने सूट होतंच असं नाही. काही राशींनी सोने घालणं टाळावं असं सांगितलं जातं. तर ४ राशींसाठी सोने खूप शुभ आणि लकी मानलं जातं.
Poha Unhealthy for Health: तुमच्या घरी पोहे हा नेहमीचा नाश्ता असतो का? अनेक भारतीयांसाठी पोहे हा आठवड्यातून किमान एकदा तरी खाल्ला जाणारा पदार्थ आहे - हलका, आरामदायी आणि पटकन बनणारा. काही घरांमध्ये तर पोह्यांसोबत कुरकुरीत जलेबी खाण्याचीही खास पद्धत असते. मात्र सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांना पोहे हा फार हेल्दी नाश्ता वाटत नाही.
Sonali Bendre Cancer Journey: अलीकडेच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बाळंतपणानंतर आणि कॅन्सरच्या उपचारांनंतर शरीरात झालेल्या बदलांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना सोनाली म्हणाली, “माझ्या उपचारांनंतर स्टेरॉइड्समुळे माझं वजन वाढलं होतं…”
Shukra Gochar 14 May: १४ मे २०२६ रोजी शुक्र ग्रह आपल्या वृषभ राशीतून बाहेर पडून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, सौंदर्य, सुख-सुविधा, कला आणि पैशाचा कारक मानलं जातं.
जेव्हा शुक्र राशी बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या नातेसंबंधांवर, आर्थिक स्थितीवर, आकर्षणावर आणि लाइफस्टाइलवर स्पष्टपणे दिसून येतो. मिथुन राशीत शुक्राचं हे गोचर संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि क्रिएटिव विचार अधिक मजबूत करेल. या काळात काही राशींना विशेष फायदा मिळेल, तर काही राशींनी थोडी काळजी घेणं गरजेचं असेल.