ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचा इराणवर हल्ला, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम चर्चेच्या दरम्यान पुन्हा संघर्ष उफाळला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणवर तीव्र हल्ला केला. इराणनेही प्रत्युत्तर दिले. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीही मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.