डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतावर गंभीर आरोप; अमेरिकेत अंमली पदार्थ तस्करीचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत अमेरिकेने भारतावर कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या २०२५ साठीच्या Annual Threat Assessment अहवालानुसार, फँटानाईल या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी भारत व चीन जबाबदार आहेत. या तस्करीमुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फँटानाईलचं उत्पादन होत असून, त्यामुळे ५२ हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अहवालामुळे अमेरिका-भारत संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.