“हा माझ्यासाठी मोठा सन्मान”, SC ने फटकारल्यानतंर ट्रम्प यांचा जागतिक कराबाबत नवा आदेश
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर १०% कर लावण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांना असा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही, ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली. हा कर तत्काळ लागू होईल आणि पाच महिने लागू राहील.