“थँक यू डार्लिंग म्हणाले आणि..”, महिला पत्रकार मुलाखत घेत असताना ट्रम्प यांचा तोल ढासळला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत २०२० च्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. पत्रकार क्रिस्टन वेल्कर यांनी पुरावे मागितल्यावर ट्रम्प संतापले आणि वेल्कर यांना भ्रष्ट व मूर्ख म्हटले. त्यांनी मुलाखत अर्धवट सोडली. ट्रम्प यांनी मतमोजणीतील उशीर हा गैरप्रकाराचा पुरावा असल्याचे सांगितले.