अमेरिकेचा मोठा ‘यू-टर्न’! रशियन तेलासाठी भारताला पुन्हा सवलत
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून समुद्रमार्गे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या खरेदीवरील निर्बंध भारतासाठी शिथिल केले आहेत. यामुळे भारताला १६ मे २०२६ पर्यंत रशियाकडून तेल आयात करता येईल. इराणकडून मात्र तेल खरेदीवर बंदी कायम आहे. या निर्णयामुळे भारताच्या तेल आयातीचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर भारताने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.