इराणसोबत युद्ध, पाकिस्तानशी मैत्री? पडद्यामागे न्यूयॉर्कमध्ये झाला मोठा राजनैतिक सौदा!
न्यूयॉर्कच्या मिडटाउनमधील रूझवेल्ट हॉटेलवर आता अमेरिकेसोबत पाकिस्तानचाही संयुक्त मालकीहक्क आहे. हे हॉटेल १९२४ साली उभारले गेले होते आणि अमेरिकन राजकारणाबरोबरच सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. १९७८ साली पाकिस्तानने हे हॉटेल लीजवर घेतले आणि १९९८ साली पूर्णपणे विकत घेतले. कोविडनंतर हॉटेल बंद पडले, परंतु २०२३ साली अमेरिकन सरकारने स्थलांतरितांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. आता अमेरिका आणि पाकिस्तानी सरकारने हॉटेलच्या पुनर्विकासासाठी करार केला आहे.