अभिमानाची ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ काही तासांतच अस्वच्छ; व्हिडिओ व्हायरल
भारताची पहिली 'वंदे भारत स्लिपर ट्रेन' १७ जानेवारीला माल्डा टाउन रेल्वे स्टेशनपासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. काही तासांतच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात प्रवाशांनी वापरलेले कप आणि रॅपर्स रेल्वेतच फेकले होते. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली असून स्वच्छतेसाठी ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग कर्मचारी उपलब्ध असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर प्रवाशांच्या वर्तनावर रोष व्यक्त झाला.