ट्रम्प यांचे दूत रशियात दाखल, पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत दिले मोठे आदेश
गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, ज्यामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही. आता अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर रशियात पोहोचले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ले तीन दिवस थांबवण्याचे आदेश दिले आहेत.