‘मुलींनी स्कर्टऐवजी सलवार घालून शाळेत यावे’, भाजपाच्या मंत्र्यांचं अजब विधान
पश्चिम बंगालचे आरोग्य मंत्री डॉ. शरदवत मुखर्जी यांनी राज्यातील शाळांना विद्यार्थ्यांच्या गणवेशात तात्पुरते बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. डेंग्यूच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे हात आणि पाय झाकले जातील, असे कपडे वापरण्याचे निर्देश दिले आहेत. मुलींना सलवार सूट आणि मुलांना पूर्ण लांबीची पँट आणि पूर्ण बाह्यांचे शर्ट घालण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.