“पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो”, भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचं वक्तव्य
भारताचे वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान भारताशी थेट लढण्याची क्षमता नसल्यामुळे पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो. मात्र, तसं झाल्यास भारत ऑपरेशन सिंदूरसारखी मोहीम राबवेल आणि यावेळी प्रत्युत्तर अधिक भयंकर असेल. कटियार यांनी पाकिस्तान कधीच सुधारणार नाही असं सांगितलं मात्र, भारतीय लष्कर देखील सज्ज असल्याचं स्पष्ट केलं.